शिक्षण, तंत्रज्ञान व आरोग्य यांची माहिती देणाऱ्या एकमेव ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

गव्हांकूररस

गव्हांकूररस- एक वरदान

     तृणरस हे मानवाला मिळालेले अनमोल असे वरदान आहे. जगभर यावर अनेक संशोधने झाली आहेत. या संशोधनातून सिद्ध झाले की गव्हाच्या अंकुरापासून बनलेला रस हा सर्वश्रेष्ठ रस आहे.
     गव्हांकूररसामधून मनुष्याला जीवनावश्यक सर्व प्रकारची पोषक तत्त्वे मिळतात. यातील पोषक घटकामुळे आजकाल या रसाला पूर्णान्न म्हणण्याची प्रथा सुरु झाली आहे.
यात अनेक प्रकारचे पोषक घटक असून रोग प्रतिकार करणारे घटकही असतात.
     हा रस निरनिराळ्या व्याधीमध्ये रामबाण औषधाचे काम करतो. विविध आजारात नैसर्गिक उपचाराचे औषध म्हणून याकडे पाहिले जाते. याच्या सेवनाने विविध विकारांना काबूत ठेवणे शक्य झाले आहे. असाध्य समजल्या गेलेल्या कर्करोगावरही याचा चांगला उपयोग होत असल्याचे दिसून येते.
     या रसाचा शरीरातील सर्वच रोगावर प्रभाव पडत असल्यामुळे शक्तिवर्धक व आरोग्यवर्धक म्हणून याचा नियमित वापर करण्यास काहीही हरकत नाही.
     आजकाल बाजारात या रसाचे चूर्ण मिळते परंतु म्हणावा तेवढा प्रभाव जाणवत नाही. यासाठी हा तृणरस ताजाच वापरावा. अमृताप्रमाणे मानवाला मदत करणारा गव्हांकूररस तयार करणे अगदी सुलभ व कमी खर्चिक आहे.

गव्हापासून तृणरस तयार करण्याची कृती.

मातीपासून बनलेली पसरत अशा नऊ कुंड्या (खोले, भांडी) घ्या. शेतातील माती आणा. या मातीत थोडेफार शेणखत किंवा गांडूळ खत घाला. यासाठी रासायनिक खताचा थोडाही वापर करू नये. ही माती वरील मातीच्या भांड्यात भरून घ्या.
  प्रथम एक भांडे घेऊन त्यात चांगल्या प्रतीचे ५० ते १०० ग्रॅम गहू पेरा. (अंकुर आणून गहू पेरल्यास लवकर उगवतात. अंकुर आणण्यासाठी दोन दिवस गहू भिजवून ओल्या कपड्यात बांधून ठेवा. अंकुर आल्यावर त्याची पेरणी करा.)
गहू पेरल्यानंतर त्याला पाणी घाला. भांडे असे ठेवा त्याला कोवळा प्रकाश लागेल. कडक उन्हात चार तासापेक्षा जास्त काळ भांडे ठेऊ नका.
दुसऱ्या दिवशी पुढील आठ दिवस वरील प्रमाणे भांडी भरा व गव्हाची पेरणी करा.
नवव्या दिवशी पहिल्या भांड्यातील उगवून आलेल्या गव्हान्कुराचा वापर करा व त्यात पुर्वीप्रमाणे माती भरून गव्हाची पेरणी कारा
   नवव्या दिवशी तयार झालेल्या अंकुरची कात्रीने बुडातून कापणी करा. कापलेले अंकुर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ते खलबत्यात किंवा मिक्सरमध्ये घालून त्याचा रस काढा व लगेचच पिऊन टाका. रस घेताना पहिल्या दिवशी थोड्या प्रमाणात घ्या. त्याचे प्रमाण हळू हळू वाढवा. या रसाचे प्रमाण ५० ते १०० मिली असावे. रोगाच्या काळात या रसाचे प्रमाण २०० मिली पर्यंत ठेवले तरी चालते. रोग बळकट असेल तर मोठ्या भांड्यात जास्त गहू पेरून किंवा भांड्याची संख्या दुप्पट करून एका दिवसात दोन भांड्यात गव्हाची लागवड करून तृणांची संख्या वाढवून हा रस दिवसातून २ वेळा तयार करून वापरू शकता.
  काही वेळा रस ना काढता हे तृण आपण प्रत्यक्षात खाऊ ही शकतो.त्यामुळे दात व हिरड्या बळकट बनतात. चोथा पोटात गेल्यामुळे पचनक्रियाही सुधारते
हा रस अनोशापोती घेतल्यास खूप फायदे होतात. हा रस नियमित घेतल्यास आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते.आजारी व्यक्तीने घेतल्यास तो आजाराच्या त्रासापासून मुक्त होऊन सुखी जीवन जगतो.
कर्करोगासारख्या आजारात हा रस खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
    



No comments:

Post a Comment